आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषण:लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका अल्पवयीन मुलीला आधी लग्नाची मागणी घातली. ती अल्पवयीन असल्याने तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचे अपहरण करून लैंगिक शोषण केले. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आकाश देविदास इंगळे ( वय 26 वर्षे रा. मालठाणा ता. तेल्हारा जि. अकोला ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी आकाश हा 2019 मध्ये त्याच्या नातेवाईकांसह पीडित मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्याकरीता गेला होता. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांनी नकार दिला. त्यानंतर 9 ऑक्टोबर 2019 रोजी मुलगी ही तिच्या मामाच्या घरी लोणाग्रा येथे जाण्याकरीता निंबा फाटा येथे ऑटोची वाट पाहत उभी असताना आरोपीने तिचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले.

यानंतर मुलीच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी भादंविचे कलम 363, 366, 376 व पोक्सो कायद्याचे कलम 3,4,5,6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारपक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी पक्ष व सरकार पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कलम 376 व पोक्सो कायद्याचे कलमांतर्गत दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

याशिवाय, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा तसेच भादंविचे कलम 363,366 नुसार दोषी ठरवून 7 वर्षाची शिक्षा व 7 हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...