आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा; ऑटोरिक्षाची वाट पाहत उभी असताना आरोपीने केले अपहरण

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल बुधवारी दिला. आकाश देविदास इंगळे (वय २६ वर्षे रा. मालठाणा ता. तेल्हारा जि. अकोला.)असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा २०१९ मध्ये त्याच्या नातेवाइकांसह पीडित मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्याकरीता गेला होता. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या वडिलांनी नकार दिला होता. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी मुलगी ही तिच्या मामाच्या घरी लोणाग्रा येथे जाण्याकरीता निंबा फाटा येथे ऑटोरिक्षाची वाट पाहत उभी असताना आरोपीने तिचे अपहरण केले होते.

त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. नंतर मुलीच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी भादंविचे कलम ३६३, ३६६, ३७६ व पोक्सो कायद्याचे कलम ३,४,५,६ नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारपक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी पक्ष व सरकार पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कलम ३७६ व पोक्सो कायद्याचे कलमांतर्गत दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा तसेच भादंविचे कलम ३६३,३६६ नुसार दोषी ठरवून सात वर्षाची शिक्षा व सात हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी बाजू मांडली.

मुख्याध्यापक व डॉक्टरचा पुरावा ठरला महत्त्वाचा
मुलगी अल्पवयीन आहे, हे निश्चित करण्यासाठी मुलीचा शाळेचा दाखला अणि मुख्याध्यापकाचा पुरावा महत्वाचा ठरला तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरचाही पुरावा न्यायालयात महत्वाचा ठरला.

बातम्या आणखी आहेत...