आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांवर कारवाई:नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 35 वाहनचालकांवर कारवाई ; 42 हजार रुपयांचा दंड पोलिसांनी केला वसूल

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन उड्डाण पूलांवर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी ३५ चालकांकडून एकूण ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालाकांची अधिक संख्या व बेशिस्त वाहन चालवण्याच्या पद्धतीमुळे अशोक वाटिका चौक ते अग्रसेन चौक व सिंधी कॅम्प छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडतात. शहरातील दोन उड्डाण पुलांचे लोकार्पण झाल्यानंतर हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून, अपघातांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. मात्र काही नागरिक उड्डाण पुलावर चढण्या-उतरण्याचे नियम तोडत आहेत. पुलावर लावण्यात आलेल्या प्रवेश बंदी, स्पीड लिमिट व इतर सूचनांचे वाहन-चालक उल्लंघन करत आहेत. पुलावर राँग साइड वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहने चालवणे, इशारा भंग करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशी पार्किंग करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा वाहन चालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यानंतरही अशीच कारवाई पोलिसांमार्फत सुरूच राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...