आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोट ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर गोवंश मांस वाहून नेणाऱ्यांवर मंगळवारी दुपारी कारवाई केली. यात 44 किलो गोवंश मांसासह 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पो. स्टे. अकोट ग्रामीणचे ठाणेदार नितीन देशमुख व स्टाफ पोलिस स्टेशन हद्दिमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस निरीक्षक नितीन देशमुख ह्यांना गोपनीय माहिती मिळाली की, येवदा येथून एक इसम त्याच्या साथिदारासह अकोट शहराकडे मोटर सायकलने अवैधरित्या गोवंश मांस घेऊन जात आहे.
यावरून पो. नि. नितीन देशमुख ह्यांनी दर्यापूर अकोट रोडवर ढगाफाटा येथे स्टाफ व दोन पंच यांचा मदतीने नाकाबंदी केली. यावेळी कारवाईमध्ये मोहम्मद अशपाक मोहम्मद मोहम्मद नजीर, मोहम्मद तन्वीर मोहम्मद अशपाक, दोन्ही रा. पेठपुरा येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती ह्यांच्याकडून 44 किलो 500 ग्रॅम गोवंश मांस किंमत 8, 900 रू मोटरसायकल एमएच 27 एएस 3252 किंमत 30 हजार रू. असा एकूण 39,900 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अकोट ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, अंमलदार जऊळकर, शैलेश जाधव, गोपालसिंग डाबेराव, सचिन कुलट यांनी केली. अवैध गोवंश व गोवंश मांसचे अनुषंगाने पो. स्टे. अकोट ग्रामीणची मागील 4 दिवसात ही पाचवी कारवाई असल्याचे समजते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.