आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण मध्य रेल्वेकडून अनिधिकृत फेरी वाल्यांना आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनिधिकृत फेरी वाल्यांविरोधात कार्यवाही करण्यात येत आहे. या अंतर्गतच आज नांदेड विभागाने मोठ्या प्रमाणावर अनिधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही केली. यात पहिल्याच दिवशी २० अनधिकृत फेरीवाल्यांकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
९ तिकीट तपासणीसांनी मोहिमेत घेतला भाग
मोहीम दुपारी २ वाजता सुरु करण्यात आली. यात नांदेड ते मुदखेड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यामध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात नांदेड-आदिलाबाद आणि आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस तसेच आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. रेल्वे मध्ये अचानक धाड पडल्याने अनिधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले. यात तब्बल २० अनिधिकृत फेरी वाल्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
फेरीवाल्यांचे सामान जप्त
अनअधिकृत फेरीवाले पाणी बॉटल, समोसे आणि इतर पदार्थ विकत होते. ते जप्त करण्यात आले. या अनधिकृत फेरी वाल्यांचा बायोडाटा बनवण्यात आल्या. पुन्हा हे फेरीवाले रेल्वे गाड्यांमध्ये अश्या प्रकारे अनअधिकृत पदार्थ विकणार नाहीत याची त्यांना ताकीत देण्यात आली. ही मोहीम अनअधिकृत विक्रेते आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यामध्ये नैतिक भीती निर्माण करण्या करिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आली. या तपासणी मोहिमे मुळे कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली.
यापुढे नियमित कारवाई
रेल्वे विभागातर्फे नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी कळविले आहे की अशा प्रकारची मोहीम नांदेड विभागातील इतर सेक्शनमध्ये ही नियमितपणे राबविण्यात येईल आणि अनिधिकृत फेरी वाल्यांना आळा घालण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.