आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपाची कारवाई:मालमत्ता कराचा भरणा न केल्याने दोन मालमत्तांना लावले सील

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने 20 डिसेंबर रोजी पश्चिम आणि उत्तर झोन मधील थकीत कराचा भरणा न केल्याने प्रत्येकी एका मालमत्तेला सिल केले.

महापालिके समोर 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर वसुल करण्याचे आव्हान आहे. थकीत करावर नियमाप्रमाणे महापालिकेला दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारता येते. या व्याजाचा फटका नागरिकांना बसु नये, यासाठी महापालिकेने 2021-2022 या आर्थिक वर्षात अभय योजना राबवली. चालु आर्थिक वर्षातही जुन महिन्या पर्यंत ही योजना सुरु ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही योजना बंद करण्यात आला.

त्यानंतर प्रशासनाने नोव्हेंेबर महिन्यात (एक महिन्यापूरती) ही योजना राबवली. मात्र अद्यापही महापालिकेला कोट्यवधी रुपयाचा कर वसुल करावा लागणार आहे. या अनुषंगानेच आता थकीत मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याचे सुरु करण्यात आले आहे.

पश्चिम क्षेत्रातील डाबकी रोड वरील भौरद येथील आनंद हॉटेल, धारक संतोष इंगळे यांचेकडे सन 2016 ते 2022-23 पर्यंतचा 1 लाख 30 हजार 177 रुपये तर उत्‍तर क्षेत्रातील आकोट रोड येथील नथमल गोयनका यांचेकडे सन 2017 ते 2022-23 पर्यंतचा 4 लाख 77 हजार 47 रुपये कर थकीत होता. थकीत कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना देवूनही थकीत कराचा भरणा न केल्याने या दोन मालमत्तांना सील करण्यात आले. ही कारवाई कर अधिक्षक विजय पारतवार, क्षेत्रिय अधिकारी विठ्ठल देवकते,क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांच्‍या मार्गदर्शनात सहा.कर अधिक्षक गजानन घोंगे,सहा.कर अधीक्षक हेमंत शेळवणे, कर वसुली लिपीक अनिल नकवाल, अरविंद पांडे, मोहन घाटोळ, फिरोज खान प्रवीण भालेराव, दिनेश देहलीवाले, प्रकाश मालगे, आदींनी केली. दरम्यान शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू मालमत्‍ता कराचा भरणा वेळेवर करून सील, जप्‍ती लीलाव सारख्‍या अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...