आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोट-तेल्हारा तालुक्यात नऊ हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई अन्न-औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आली. या वेळी व्यावसायिकांकडून ५५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी ही कारवाई केली.
या तपासणीत अस्वच्छता, अन्न व मानदे कायद्याअंतर्गत परवाना अथवा नोंदणी दर्शनी भागावर न लावणे, पाणी पिण्यायाेग्य आहे किंवा नाही याबाबत पाणी तपासणीचा अहवाल न ठेवणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी न करणे, कामगारांनी अॅप्रन, हातात मोजे, मिडकॅप न घालणे इ. त्रुटी आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.