आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई:अकोट, तेल्हारा तालुक्यात अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई, ५५ हजार रुपये दंड वसूल

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट तेल्हारा तालुक्यात नऊ हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतिने करण्यात आली. यावेळी व्यवसायिकांकडून ५५ हजाराला दंड वसूल करण्यात आला. कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

हॉटेलची तपासणी

अकोट व तेल्हारा तालुक्यात विभागाच्या वतिने हॉटलची तपासणी करण्यात आली. यात नऊ हॉटेल्सची तपासणी करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून ५५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी ही कारवाई केली.

या आढळल्या त्रृटी

तपासणीत अस्वच्छता, अन्न व मानदे कायद्याअंतर्गत परवाना अथवा नोंदणी दर्शनी भागावर न लावणे, पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबत पाणी तपासणीचा अहवाल न ठेवणे, कामगांराची वैद्यकीय तपासणी न करणे, कामगांरानी एप्रॅन, हातात मोजे, हेडकॅप न घालणे इ.त्रुटी आढळून आल्या. अन्न व औषध प्रशासन अकोला कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी ही कारवाई केली.

नियमांचे पालन करण्याच्या सूचना

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीचे रोग वाढत आहेत. अशात अन्नपादर्थ विक्री करताना योग्य खबरदारी करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहे. येत्या काळात पुढेही प्रशासनाकडून अन्य तालुक्यांमध्ये अशाप्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी अन्न व मानदे कायद्याअंतर्गत परवाना अथवा नोंदणी दर्शनी भागावर लावणे, पाणी पिण्याची योग्य व्यवस्था, कामगांराची वैद्यकीय तपासणी आदींवर भर देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...