आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मूर्तिजापूर-हिरपूर मार्गे आसरा रस्त्यावरील रोहणा येथील उमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी पथक गठन करून ३१ जुलैच्या रात्री दोन मोटरसायकलीवर घटनास्थळी रात्री ११ वाजताच्या सुमारात कारवाई केली. या दरम्यान ट्रॅक्टर चालकाने पळ काढल्याने त्याच्याविरुद्ध माना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जुलैच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास रोहणा येथील उमा नदीच्या पुलाजवळ उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तलाठी अजय तायडे, मंडळ अधिकारी नागोलकर व तलाठी रमेश वाघमोडे यांच्यासह आले असता त्यांना ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर येताना दिसला. त्याला थांबून पाहणी केली असता ट्रॅक्टरचा क्र. एमएच.२९-जेके-०७२५ असल्याचे दिसून आले. तर ट्रॉलीवर कुठलाही नंबर नव्हता. ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर चालकाने त्याचे नाव राज घोसले राहणार गायरान असे सांगितले.
ट्रॅक्टरवर उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी अजय तायडे यांना बसण्यास सांगून ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर माना येथील पोलिस स्टेशन येथे घेण्यास सांगितले. तर दुसऱ्या ट्रॅक्टरवर नागोलकर यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर काही अंतर गेल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने अचानक वेग वाढवून पळ काढला. एका हाताने स्टेअरिंग पकडून दुसऱ्या हाताने त्याने तलाठी तायडे यांना मारहाण केली. हा ट्रॅक्टर ब्रह्मी गावाजवळ अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या खाली नालीत जाऊन फसला. तलाठी अजय तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कलम ३७९, ३५३, ३३२, १८६ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. तर दुसऱ्या ट्रॅक्टरचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.