आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासन:जुना धान्य बाजारातील दुकानांवर होणार आज कारवाई ; सात दिवसांची मुदत संपली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना धान्य बाजारातील जागेवर अतिक्रमण केलेल्या ८७ दुकानदारांना जिल्हाधिकारी, प्रभारी मनपा आयुक्त नीमा अरोरा यांनी दुकाने खाली करण्यासाठी सात दविसांचा दिलेला अल्टिमेटम संपुष्टात आल्याने या दुकानांवर २ जानेवारी रोजी धडक कारवाई केली जाणार आहे.

नझुल शीट क्रमांक ३९ बी, भुखंड क्रमांक १२, ५४/१ आठ हजार ९११ चौरस फूट जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. ही जागा महसुल विभागाच्या मालकीची आहे. ही जागा १९८० मध्ये लघु व्यावसायिकांना दैनंदिन शुल्क आकारण्याच्या पद्धतीने देण्यात आली होती. या जागेवर कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र २० रुपये रोज यानुसार भाड्याने घेतलेल्या या जागेवर अनेकांनी पक्के बांधकाम केले. या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी कारवाई सुरू केली होती. व्यावसायिकांनी साहित्य काढण्यास वेळ मागीतला. प्रशासनाने आठ दविसाचा कालावधी दिला.

त्यानंतर पथकाने कारवाईसाठी २८ नोव्हेंबरचा दविस नविडला. मात्र दहा दुकाने पाडल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने या व्यावसायिकांना सात दविसांची मुदत दिली होती. ही मुदत संपुष्टात येत असल्याने २ जानेवारी २०२३ रोजी धडक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त नीमा अरोरा या स्वत: उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...