आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष नेतृत्व:शिंदे गटातील कार्यकर्ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी गत आठवड्यात शिंदे गटात सहभागी झाल्यानंतरही नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या गटातील कार्यकर्ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत असताच आता शिंदे गटात जाण्यापूर्वी शिवसेनेचे काही आजी-माजी पदाधिकारी पक्ष नेतृत्वाच्या भेटीसाठी पुन्हा प्रयत्न करीत असल्याचे समजते. पक्षप्रमख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक महिन्यापूर्वी महाआरातीमध्ये सहभगी झालेले विधान परिषदेेचे माजी आमदार गाेपिकिशन बाजाेरीया व त्यांचे पूत्र आमदार विल्पव बाजाेरीया यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. माजी आमदार गाेपिकिशन बाजाेरीया यांच्यासह दाेन माजी नगरसेवक, उपशहर प्रमुख, युवा सेना जिल्हाध्यक्षांसह जवळपास २६ जण शिंदे गटात सहभागी झाल्याने जिल्हयात शिवसेनेत फूट पडली असून , बाजाेरीया यांना शिंदे गटाकडून संपर्क प्रमुखपदही बहाल करण्यात आले आहे.

अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेतही गटबाजी कमी नाही. जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गाेपिकिशन बाजाेरीया यांचा गट असल्याची चर्चा नेहमीच रंगते. राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटाकडून जिल्ह्यात राजकीय पेरणी सुरू झाली. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत दाेन नेत्यांनी तर अकाेल्यात शिवसेनेच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली हाेती. दरम्यान बुधवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेश केला. यात बाजाेरीया पिता-पुत्रांसह उपशहर प्रमुख याेगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, माजी नगरसेवक शशीकांत चाेपडे, अश्विन नवले आदींचा समावेश हाेता.

या पदाधिकाऱ्यांकडे लागले सर्वांचे लक्ष
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ५० ते ६० आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची शिंदे गटात सहभागी हाेण्याच्या अनुषंगाने बैठक झाली हाेती. त्या बैठकीत शिवसेनेत कसे डावलण्यात आले, याचा पाढाच वाचण्यात आला हाेता. याबैठकीत महिला पदाधिकारीही हाेत्या. मात्र तूर्तास तरी बुधवारी जवळपास २६ जणच गटात सहभागी झाले आहे. त्यामुळे बैठकीतील अन्य पदाधिकारी शिंदे गटात सहभागी हाेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...