आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ सातेगावात कविसंमेलन‎:प्रतिभा साहित्य संघ शाखा स्थापनेनिमित्त उपक्रम‎

अंजनगाव सुर्जी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले मराठी साहित्य समृद्ध आहे.‎ साहित्यिकांच्या साहित्याचे वाचन व‎ श्रवण केल्याने जीवनाला चांगले‎ वळण लागते. लेखनाची प्रेरणा देखील‎ मिळते. नवीन पिढीला याची प्रकर्षाने‎ गरज आहे. या जाणिवेतून प्रतिभा‎ साहित्य संघाच्या शाखेची स्थापना व‎ वऱ्हाडी कविसंमेलनाचे सातेगाव‎ येथील ईश्वर चौकात रविवारी (दि.२)‎ आयोजन करण्यात आले होते.‎ या प्रसंगी संघाची २५ सदस्यांची‎ कार्यकारिणी गठित करण्यात आली.‎ कविसंमेलनात संघाचे संस्थापक‎ अध्यक्ष विठ्ठल कुलट, विजय सोसे,‎ गजानन मते यांच्या शेती माती आणि‎ सामाजिक व व्यंगात्मक कवितांच्या‎ बहारदार सादरीकरणाने कविसंमेलन‎ रात्री उशिरापर्यंत रंगले.

यासोबतच‎ संघाचे शाखाध्यक्ष बाबाराव पाथरकर,‎ सुधीर खोडे, हरिणारायण ढोले, संदीप‎ गावंडे, विशाल कुलट, अनंत कुलट‎ यांनीही बहारदार कविता सादर केल्या.‎ कविसंमेलनाचे सूत्रसंचालन विठ्ठल‎ कुलट यांनी केले. कार्यक्रमाला राम‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मरकाळे, रामदास गावंडे, प्रतिभा‎ साहित्य संघाचे अकोला ग्रामीण‎ जिल्हाध्यक्ष अरुण काकड,‎ शाखाध्यक्ष बाबाराव पाथरकर,‎ उपाध्यक्ष चंद्रकिशोर काळे, सदस्य‎ गजानन काळे, अमोल दाभाडे,‎ ज्ञानेश्वर गावंडे, सनी शेळके, मोहन‎ पळसकर, छोटुभाऊ मानकर,‎ पुरुषोत्तम काळे, अंकुश मानकर,‎ उज्वल ठाकरे, श्रीधर तिवाने, राजूभाऊ‎ गिरनाळे, विठ्ठल ढोले, किशोर गावंडे,‎ सुधीर काळे, राम देशमुख, विलास‎ पातोंड, रवींद्र खवणे, कपिल वानखडे,‎ अ. एजाज अ. अयास, छोटुभाऊ‎ देशमुख आदी उपस्थित होते. आभार‎ अमरदीप काळे यांनी मानले.‎