आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:पाण्यातील माशांचा तीव्र उन्हाने मृत्यू; शहापूर वाघोडा प्रकल्पात दररोज दगावताहेत दोन ते तीन क्विंटल मासे

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख गावाजवळील शहापूर वाघोडा प्रकल्पात मासे मृतावस्थेत आढळून येत आहेत. हवामान बदलामुळे तसेच वाढत्या उन्हामुळे माशांचा मृत्यू होत असल्याची माहिती मस्य आयुक्त विनोद राठोड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

शहापूर वाघोळा प्रकल्पात धरणाच्या काठावर दररोज दोन ते तीन क्विंटल मासे हे मृतावस्थेत आढळून येत आहेत. मृत झालेले मासे काठावर फेकले जात आहेत. प्रकल्पाच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करता पाठवल्यानंतर नेमके कारण समोर येणार आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ७.७९ दशलक्ष घनमीटर आहे. २०१७ मध्ये हे धरण कार्यान्वित झाले. या प्रकल्पात पणजच्या भोई समाज बांधवाचे (स्वर्गीय जतीरामजी मत्स्यव्यवसाय सरकारी संस्था मर्यादित पणज व अकोट.) अध्यक्ष वामनराव गुंजाजी तायडे, उपाध्यक्ष राजेश सुकलाल कहर यांनी मत्स्य बीज सोडले आहेत. आता मासे विक्रीयोग्य झाली आहेत. वामनराव तायडे व राजेश कहर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या २० ते २५ दिवसांपासून अचानक उष्ण वातावरणामुळे घडत आहे अशी घटना.

प्रकल्पाच्या पाण्याचा नमुना घेऊ
उन्हाने जलाशयातील पाण्याचे तापमान वाढून त्यातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते. यामुळे काही मासे मरतात. ४४ अंशांवर तापमान गेल्याने हा प्रकार झाला असावा. प्रकल्पाची पाहणी करुन पाणी नमुना तपासणीसाठी घेण्यात येईल. विनोद राठोड, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय प्रभारी.

मत्स्य व्यावसायिकांची गुंतवणूक ‘पाण्यात’
मत्स्य व्यवसायिकांची ६५ जणांची ही संस्था असून, यात व्यावसायिकांनी लाखोची गुंतवणूक करून मत्स्य बीज टाकले. माशांचे वजन ५ ते १५ किलोपर्यंत असून, ते विक्री योग्य आहेत. मात्र साठवलेल्या तीन वर्षापासून परिपक्व मासे विक्रीला काढणे सुरु होताच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले. भोई समाज मत्स्य व्यवसायिकांचा व्यवसाय मासेमारी असल्याने ते संकटात सापडले . त्यामुळे मासे जिवंत राहण्यासाठी मत्स्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष वामनराव तायडे यांनी केली. मत्स्य विभागाला माहिती देऊनही पाहणीही केली नसल्याचा आरोप मत्स्य व्यावसायिकांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...