आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद:अडाण आणि बेंबळा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पाचे दरवाजे उघडले

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसापासून पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. 11 सप्टेंबर रोजी पश्चिम विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झाली. एकाच दिवशी 136 मिमी तर यवतमाळ जिल्ह्यातील बेंंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 109 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असल्याने पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे.

पश्चिम विदर्भात नऊ मोठे, 27 मध्यम तर 275 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे 3108.77 दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तुर्तास 2763.77 दशलक्ष घनमिटर (88.90 टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्प ओंसडून वाहु लागले तर काही प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. सर्वाधिक पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यातील अडाण पाणलोट क्षेत्रात झाली.

एक जुन पासूनचा पाऊस

  • ऊर्ध्व वर्धा - 1027.00
  • पुस प्रकल्प - 607.00
  • अरुणावती - 920.00
  • बेंबळा - 1057.00
  • काटेपूर्णा - 536.00
  • वान प्रकल्प - 1029.00
  • नळगंगा - 340.00
  • पेनटाकळी - 731.00
  • खडकपूर्णा - 624.00

6 मोठ्या प्रकल्पातून विसर्ग

अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील पुस, अरुणावती, बेंबळा, काटेपूर्णा, खडकपूर्णा या सहा मोठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

या मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग

27 मध्यम प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, पंढरी, गर्गा. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. अकोला जिल्ह्यातील मोर्णा, उमा. वाशिम जिल्ह्यातील अडाण, एकबुर्जी. बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, उतावळी या मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...