आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना शनिवारी १४ मे रोजी अभिवादन करण्याकरता अ. भा. छावा संघटनेतर्फे अकोला शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत घेण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ११ वाजता न्यू तापडिया नगर येथील छावा बालोद्यानात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत आकाशवाणी केंद्र समोर असलेल्या जि. प. कर्मचारी भवन येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दीपक मोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. अभय पाटील, डॉ. हर्षवर्धन मालोकार, चंद्रकांत झटाले, प्रदीप खाडे, डॉ. श्रीराम लाहोळे, सुधाकर पाटील, अश्विन नवले, संतोष ढोरे, मेजर संजय काळे, विठ्ठल वाघ, मुन्ना खान उपस्थित होते. या वेळी संघटनेचा दोन वर्षातील कार्याचा अहवाल जिल्हाध्यक्ष रणजीत काळे यांनी मांडला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी युवकांना योग्य दिशा दाखवून शिक्षण व व्यवसायाकरता प्रोत्साहित केले.
चंद्रकांत झटाले यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत घेण्यात यावे, याकरता ठराव मांडला व तो सर्वानुमते संमत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक मोरे यांनी युवकांना धार्मिक वादात न अडकता स्वतः ची आणि समाजाची प्रगती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये अकोला जिल्ह्याला येणाऱ्या काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या नवीन पिढीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. स्वप्नील लाहोळे, डॉ. नरेंद्र सरोदे, डॉ. प्रणय महल्ले, डॉ. शिवाजी ठाकरे, डॉ. विवेक ढोरे, डॉ. मोनीश वाकोडे, डॉ. भूषण सपकाळ, डॉ. साक्षी अवचार या युवा डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गोतमारे, उपजिल्हा प्रमुख बालू वानखडे, जिल्हा सचिव मनीष वाडेवाले, महानगर अध्यक्ष शुभम धनभर, राजा शहा, महेंद्र भगत, अकोला ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर गावंडे, अकोट-तेल्हारा विभाग प्रमुख सचिन नागपुरे, अकोट ता. अध्यक्ष पंकज कौलखेडे, अनिल देंडवे, अकोट ता. उपाध्यक्ष शिवा अरबट, तेल्हारा ता. अध्यक्ष अतुल डिक्कर, बाळापूर ता. अध्यक्ष पंकज कळसकर, पातूर ता. अध्यक्ष राहुल भगत, विद्यार्थी तालुका अध्यक्ष प्रशांत तायडे, दिनेश काळे, वसंतराव पांडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राम महाराज गव्हारे व नीलेश महाराज मते यांनी केले. योगेश गोतमारे यांनी आभार मानले.
रॅलीकरिता संपूर्ण जिल्ह्यातून संघटनेचे योगेश सपकाळ, ज्ञानेश्वर पाचपोहे, शंकर माहोरे, अनिल तायडे, विवेक अंबाडकर, गोपाल वरणकार, आकाश मराठे, संदीप बुंदेले, गौरव जुमळे, शिवम भलतिलक, नारायण उमाळे, रवी अखतकर, महादेव तायडे, मंगेश राठोड, गणेश जाधव, सुधीर काडे, सागर वायझाडे, नीरज रहाटे, हर्षल देशमुख, पंकज उपाध्ये, अश्विन कपले, उमेश काळे, धनंजय लांडे, नरेश सूर्यवंशी, हरिदास तायडे, गोलू तायडे, गोपाल काकडे, शेखर नागपुरे पदाधिकारी हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.