आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुने शहरातील डाबकी रोड ते जुना बाळापूर या महत्वपूर्ण मार्गांना जोडणारा कॅनॉल मार्गाच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार (26 जुलै) शिवसेनेच्या वतीने डॉबकी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नागरिकांची पावसामुळे कोंडी
पूर्वी हा रस्ता कॅनॉल होता. मात्र, कॅनॉल लगत अनेक उपनगरे वसल्याने पाटबंधारे विभागाने हा कॅनॉल बंद केला. हा संपूर्ण मातीचा रस्ता असल्याने नागरिकांना पावसाळ्यात येणे-जाणे करणे अडचणीचे ठरले आहे. चिखल गाठत नागरिकांना घर गाठावे लागते. तसेच रस्ताच नसल्याने या मार्गावर पथदिवेही नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. या रस्त्याच्या खडीकरणासाठी 67 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे. मात्र तुर्तास या निधीच्या खर्चावर स्थगिती असल्याने या रस्त्याच्या खडीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळेच या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना अकोला पश्चिम प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात डाबकी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
यांचा होता सहभाग
या आंदोलनात पूर्व शहर प्रमुख अतुल पवनीकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, शिवसेना संघटक संतोष अनासने, उपशहर प्रमुख बबलू उके, आकाश ठाकूर, शरद तुरकर, प्रकाश वानखडे, अभिषेक खडसाळे, दिनेश सरोदे, रुपेश ढोरे, गजानन चव्हाण, देवा गावंडे, संतोष धुतोंडे, गोपाल गाडे, दिनेश सरोदे, नितीन ताकवाले, राजेश खानापुरे, मुकेश निमजे, गजानन बोराडे, अनिल परचुरे, आमले पाटील, गणेश गोगे, आशु तिवारी, हर्षद चारशे, मनोज बाविस्कर, संतोष नागदिवे,अर्जुन शिरसाठ, संतोष टापरे, रुपेश फाटे, दीपक मराठे, राजदीप तोहरे, दिनेश जामोदे, शुद्धोधन वानखडे, काशीद काका, आकोटकर काका, गंगतीरे सर, ज्योत साहेब, संदीप नागोराव गावंडे, आबा गायकवाड, खोब्रागडे काका, दादू सानप, सोनू काकड, विजू डांबरे, चित्ते काका, राहुल वानखडे, योगेश सरोदे आदींसह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.