आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ-इकोसर्ट फ्रान्समध्ये करार:सेंद्रिय प्रमाणिकरणच्या नवीन अभ्यासक्रमाला 25 ऑगस्टपर्यंत घेता येणार प्रवेश

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व इकोसर्ट (ईअँडएच) फ्रान्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार सेंद्रिय प्रमाणिकरण या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.

प्रवेशासाठी मुदत वाढवली

कौशल्य विकासाच्या दृष्टीने साकारलेल्या या उपक्रमाची प्रवेश प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. परंतु सलग शासकीय सुट्ट्या असल्याने आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार ही मुदत 25 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. कौशल्य आणि व्यावसायिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण या अभ्यासक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. अधिक महितीसाठी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना संधी

विद्यापीठाद्वारे प्रस्तावित सेंद्रिय प्रमाणीकरण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हा कृषी अथवा कृषी संलग्न तथा विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर करता येणार आहे. विद्यार्थ्यांना सशुल्क प्रवेश घेता येईल. विद्यापीठद्वारे 2015 मध्ये स्थापन सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे हा पदविका कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमाविषयी...

नाव : सेंद्रिय प्रमाणीकरण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

शैक्षणिक अर्हता : कृषी अथवा विज्ञान विषयातील पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी

कालावधी : एक वर्ष

माध्यम : इंग्रजी

शुल्क : 35 हजार रुपये

संधी कुठे

अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक, देशातील नामांकित संस्थामधील विशेषज्ञ आणि इकोसर्ट (ई अँड एच) फ्रान्स यांचे विषय तज्ज्ञ विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. काही तासिका या आभासी पद्धतीद्वारे घेण्यात येतील. अभ्यासक्रमामध्ये 30 वर्ग तासिका आणि 30 प्रात्यक्षिकांच्या तासिका राहतील. अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे सेंद्रिय प्रमाणीकरण या क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, आंतरराष्ट्रीय संस्था तसेच खासगी संस्थांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील.

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश

ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तथा संलग्न विषयामधून अधिक गुणांक संपादन केले तसेच इतर विज्ञान विषयामधून अधिक टक्केवारी प्राप्त केली, अशा विद्यार्थ्यांचे गुणांक किवा टक्केवारी लक्षात घेऊन गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल. प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल करताना प्रवेश शुल्काचे 250 रुपये एवढे डिमांड ड्राफ्ट द्वारे भरावयाचे आहे, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...