आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. आंबेडकर म्‍हणाले:आम्ही उद्धवसेनेसोबत जाण्यास तयार, भाजपला आता एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायच्या आहेत

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने आतापर्यंत एका रिपब्लिकन पक्षाचे दहा रिपब्लिकन पक्ष केले. आता भाजपलाही एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायच्या आहेत. त्या होऊ द्यायच्या की नाही, हे उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना स्पेस न देता त्यांना सर्व निवडणुका लढवाव्या लागतील. आम्ही शिवसेनेसोबत (उद्धवसेना) जाण्यास तयार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे सांगितले.

शिवसेना आणि शिंदेसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करण्याचे टाळत ते म्हणाले की, सध्याच्या राजकीय नाट्याचे डायरेक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग, कॅमेरामन भाजपच आहे. हा कालखंड समझोत्याचा आहे. त्याला धरूनच मागच्या लोकसभेतही काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पाच वेळा पराभूत झालेल्या त्याच जागा आम्हाला द्या, असाही प्रस्ताव दिला. आता शिवसेना आणि भाजपचे भांडण आहे. आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत. आम्ही भाजपसोबत जात नाही, याचा गैरफायदा काँग्रेस आणि इतर पक्ष घेताहेत, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. दरम्यान, अॅड. आंबेडकरांनी भाजपवर केलेल्या टीकेविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांना आमच्याबद्दल स्क्रिप्ट कोण लिहून देते हे पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...