आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Adv. Sadavarte, Adv. Jayashree Patil Interrogated For Three Hours In Akot; Rs 74,400 Taken From ST Employees Returned To Police |marathi News

तीन तास चौकशी:अॅड. सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील यांची अकोटमध्ये तीन तास चौकशी; एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले 74,400 रुपये पोलिसांकडे केले परत

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॅड. जयश्री पाटील यांच्याविरुद्ध अकोट पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी दोघेही गुरुवारी अकोट शहर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पोलिस निरीक्षक यांच्या कक्षात दोघांचीही जवळपास तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी अकोट येथील एसटी कर्मचाऱ्यांकडून ७४ हजार ४०० रुपयांची रक्कम घेतली होती त्यांनी परत केली.

अॅड. सदावर्ते याच्याविरुद्ध अकोट पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्या प्रकरणी विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी सदावर्ते यांनी जेव्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा त्यांनी वकिलाची फी म्हणून जी रक्कम अकोट येथील एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतली होती. ती रक्कम परत करण्यास तयार आहे, असे न्यायालयाला सांगितले होते. त्या अटीवर न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज मंजूर केला होता.

गुरुवारी अकोट पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॅड. जयश्री पाटील दोघेही हजर झाले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी चौकशी केली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार जे ७४ हजार ४०० रुपये परत करायचे होते, ती रक्कम त्यांनी गुरुवारी पोलिसांकडे जमा केली. पोलिसांनी त्यांना गुन्ह्याच्या तपासाबाबत जे प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरे सदावर्ते यांनी दिली. तसेच पुढील तपासासाठी हजर व्हावे लागेल तेव्हा ते हजर होतील, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली.

अकोल्यात काही कर्मचाऱ्यांनी केले स्वागत
गुरुवारी सकाळीच अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॅड. जयश्री पाटील हे दाखल झाले होते. एसटी आगारामध्ये दोघांचेही एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत स्वागत केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रक्कम केली परत
अॅड. गुणरत्न सदावर्ते व अॅड. जयश्री पाटील हे जामिनावर आहेत. त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार ७४ हजार ४०० रूपये जमा केले आहेत. तपासाच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
प्रकाश अहिरे, पोलिस निरीक्षक अकोट शहर

बातम्या आणखी आहेत...