आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष‎:जि​​​​​​​ल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवला‎ काँग्रेसचा मोर्चा ; पोलिस-आंदोलकांत संघर्ष‎

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेसचे‎ नेते राहुल गांधी यांची‎ अंमलबजावणी संचालनालयाने‎ चौकशी केल्याचे शुक्रवारी संतप्त ‎ ‎ पडसाद उमटले. कॉग्रेसचे‎ नेते-कार्यकर्ते अकोल्यात आक्रमक‎ होत त्यांनी जिल्हाधिकारी‎ कार्यालयावर धडक दिली. मात्र पोलिसांनी त्यांना कार्यालयात ‎जाण्यापूर्वीच अडवले. यावेळी‎ आंदोलक व पोलिसांमध्ये संघर्ष‎ झाला. पोलिसांनी बळाचा वापर‎ करीत आंदोलकांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलिस- नेत्यांमध्ये शाब्दिक ‎चकमकही झाली.‎ केंद्रातील मोदी सरकारकडून‎ तपास यंत्रणांचा गैरवापर होत‎ असल्याचा आरोप करीत‎ काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेणे‎ सुरूच ठेवले. यापूर्वी बुधवारी रास्ता‎ रोको व टायर जाळून निषेध नोंदवला‎ होता. त्यानंतर शुक्रवारी गांधी रोड,‎ पंचायत समितीमार्गे जिल्हाधिकारी‎ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.‎ आंदोलक जिल्हाधिकारी‎ कार्यालयाजवळ पोहोचताच‎ पोिलसांनी त्यांना पोलिस व्हॅनमध्ये‎ बसण्यास सांगितले.

मात्र‎ आंदोलकांनी नकार देत पुढे जाण्याचा‎ प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांनी‎ बळाचा वापर करीत त्यांना रोखले.‎ परिणाम आंदोलकांनी रस्त्यावरच‎ ठिय्या दिला. पोलिसांनी या सर्वांना‎ व्हॅनमध्ये बसवून पोलिस ठाण्यात‎ नेले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष अशोक‎ अमानकर, माजी आमदार बबनराव‎ चौधरी, अॅड. नातिकोउद्दिन खतीब,‎ कार्याध्यक्ष राजेश भारती, प्रदेश‎ प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, पर्यावरण‎ सेलचे जिल्हाध्यक्ष अनंत गावंडे, रवी‎ अरबट, डॉ. झिशान हुसेन, मो. बद्रु‎ जमा, मदन भरगड, युवक कॉंग्रेसचे‎ जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, अॅड.‎ महेश गणगणे, पुष्पा‎ गुलवाडे आदी सहभागी झाल्या.‎ पोलिस -नेत्यांमध्ये खडजंगी :‎ काँग्रेसचे माजी आमदार व काही नेते‎ जिल्हाधिकारी-निवासी‎ उपजिल्हाधिकाऱ्यांच्य कक्षाकडे‎ निघाले. पोलिसांनी तातडीने धाव घेत‎ त्यांना रोखले.

आम्ही केवळ मोजके‎ नेतेच निवेदनासाठी जात असल्याचे‎ आंदोलक म्हणाले. मात्र त्यांना‎ पोलिसांनी रोखून धरले. यावर तुम्ही‎ कोणाला रोखताय, का रोखताय,‎ असे सवाल नेत्यांनी पोलिसांना केले.‎ यारुन पोलिस व नेत्यांमध्ये खडाजंगी‎ झाली. अखेर काही वेळाने वाद‎ मिटला आिण त्यांना निवासी उ‎ पजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊ‎ देण्यात आले. याठिकाणी नेत्यांनी‎ निवेदन दिले.‎ काँग्रेस नेत्यांच्या बदनामीचा‎ प्रयत्न : केंद्रातील भाजप सरकार‎ जनतेच्या प्रश्नांप्रती नापास झाले‎ आहे.

आपले अपयश झाकण्यासाठी‎ विरोधी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या‎ गुन्हात अडकवण्याचे काम करत‎ असल्याचा आरोप काँग्रेसने‎ जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या‎ निवेनदनात केला. सन २०१५मध्ये बंद‎ झालेले नॅशनल हेरॉल्डप्रकरण पुन्हा‎ उकरून काढून कॉग्रेस नेत्यांची‎ बदनामी करण्यात येत आहे. सन‎ १९३८मध्ये सुरू झालेले ‘ नॅशनल‎ हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या‎ आंदोलनाचे मुखपत्र म्हणून काम‎ करीत होते.काँग्रेस नेत्यांच्या‎ चौकशीचा आम्ही निषेध करीत‎ असल्याचे निवेदनात नमूद केले

बातम्या आणखी आहेत...