आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा:कोरोनानंतर प्रथमच रंगल्या मैदानी स्पर्धा; 3 शाळांनी पटकावले विजेतेपद

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोलाद्वारा आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 26 ते 29 जुलै दरम्यान लबहादुर शास्त्री स्टेडियम अकोला येथे करण्यात आले. स्पर्धेचे अंतिम सामने शुक्रवारी (29 जुलै) खेळण्यात आले.

17 वर्ष वयोगटातील विजेता

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022 मध्ये विविध गटात शाळांनी विजेतापट पटकावले. 17 वर्ष मुले ग्रामीणमध्ये प्रथम क्रमांक अल महमूद इंटरनॅशनल स्कूल, पाचमोरी, द्वितीय क्रमांक श्रीसमर्थ पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रिधोरा, तर तृतीय क्रमांक- साने गुरुजी विद्यालय खडकी यांनी पटकावला. 17 वर्ष मुली ग्रामीण प्रथम क्रमांक श्री समर्थ पब्लिक स्कूल कनिष्ठ महाविद्यालय रिधोरा, द्वितीय क्रमांक अल महमूद इंटरनॅशनल स्कूल पाचमोरी, तर 17 वर्ष मुली मनपा क्षेत्र प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक नोवेल स्टेट बोर्ड स्कूल, 17 वर्ष मुले मनपा क्षेत्र प्रथम क्रमांक उस्माना आजाद हायस्कूल, द्वितीय क्रमांक अग्लो उर्दू हायस्कूल यांनी प्राप्त केला.

14 वर्ष वयोगटातील विजेता असे

14 वर्ष मुले मनपाक्षेत्र प्रथम क्रमांक उस्माना आझाद हायस्कूल, द्वितीय क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक सुफ्फा इंग्लिश स्कूल,14 वर्षे मुले ग्रामीण प्रथम क्रमांक अल मेहमूद इंटरनॅशनल पांचमोरी, द्वितीय क्रमांक श्रीसमर्थ पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रिधोरा, तृतीय क्रमांक साने गुरुजी विद्यालय खडकी यांनी प्राप्त केला. स्पर्धांमध्ये पंच म्हणून सईद खान, नईम खान, फईम खान, उमेश पिल्ले, सलीम खान, अब्दुल अजीज, अंजार कुरेशी, निशांत वानखडे, रहीम खान यांनी कार्य केले असून स्पर्धा समन्वयक म्हणून लक्ष्मीशंकर यादव यांनी कार्य केले आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...