आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील घुंगशी, काटेपूर्णा बॅरेज नंतर आता अकोला तालुक्यातील काटीपाटी बॅरेजचे शेगाव येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन प्रकल्पाचे डिव्हीजन अन्य जिल्ह्यात स्थानांतरीत केल्या नंतरही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.
अकोला तालुक्यात पूर्णा नदीवर काटीपाटी बॅरेजचे काम सुरू आहे. या प्रकल्पाची साठवण क्षम 8.25 दशलक्ष घनमिटर असून या प्रकल्पातून 1800 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मात्र सुधारीत प्रशासकीय मंजुरी मिळाल्या नंतर हे काम सुरू होईल. या बॅरेजचे कार्यालय आता पर्यंत लघु पाटबंधारे विभाग अकोलाकडे होते. मात्र आता अकोला तालुक्यातील या बॅरेजचे डिव्हिजन शेगावला स्थानांतरीत करण्यात आले आहे.
यापूर्वी 2 प्रकल्पाचे डिव्हिजन अन्य जिल्ह्यात
मूर्तिजापूर तालुक्यात पूर्णा नदीवर घुंगशी येथे घुंगशी बॅरेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जलवाहिनी अंथरण्याचे (वितरीका) काम सुरू आहे. या बॅरेजची साठवण क्षमता 17.45 दशलक्ष घनमिटर आहे. या बॅरेज मधून 6 हजार 343 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. तर मूर्तिजापूर तालुक्यात काटेपूर्णा नदीवर काटेपूर्णा बॅरेजचे बॅरेजचे काम 60 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मात्र पूनर्वसनामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे.
या प्रकल्पाची साठवण क्षमता 7.79 दशलक्ष घनमिटर असून 4 हजार 137 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. हे दोन्ही प्रकल्प मूर्तिजापूर तालुक्यातील (अकोला जिल्ह्यातील) आहेत. मात्र या दोन्ही प्रकल्पाचे डिव्हिजन अन्य जिल्ह्यात आहे. घुंगशी बॅरेजचे डिव्हिजन अमरावती येथे तर काटेपूर्णा प्रकल्पाचे डिव्हिजन खामगाव येथून शेगाव येथे स्थानांतरीत करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना मानसिक त्रास
मूर्तिजापू ते खामगाव हे अंतर 100 किलोमिटर आहे. तर मूर्तिजापूर ते अमरावती हे अंतर 60 किलोमिटर आहे. तर अकोला ते शेगाव हे अंतर 50 किलोमिटर आहे. त्यामुळे काटेपूर्णा बॅरेज आणि घुंगशी बॅरेज, काटीपाटी बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना खरेदी विक्रीचे प्रमाणपत्र आणण्यासाठी खामगाव आणि अमरावती येथे जावे लागते. यासाठी पैसा, श्रम अधिक प्रमाणात खर्च होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.