आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:निकालानंतर बाबांना फोन केला, ते रडायलाच लागले, परतवाड्याच्या आदित्यला विज्ञान शाखेत 92.67 टक्के

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निकालानंतर पहिला फोन बाबांना केला. मी माझ्या महाविद्यालयात अव्वल आल्याचे आणि ९२.६७ टक्के मिळाल्याचे सांगितले. वडिलांना फोनवरच रडू कोसळले. त्यांना हा आनंद व्यक्त करता येत नव्हता, असे सांगतोय विज्ञान शाखेत ९२.६७ टक्के गुण मिळवलेला आदित्य गजानन सावरकर.

आदित्य मूळचा अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याचा. बारावी शिकत असतानाच त्याने नीटची तयारीही सुरू केली. वडील मजुरीने कुशनचे काम करतात. आईही मिळेल तशी हातमजुरी करते. नातेवाईक व ओळखीतून वडिलांनी नीटच्या क्लाससाठी शुल्काची व्यवस्था केली. त्यांना अनेकदा आर्थिक अडचणी आल्या. निकालाचा फोन गेल्यावर ते आनंदाने रडायला लागले.

मला डॉक्टर व्हायचेय
परतवाड्यातील प्रा. मुळे सरांकडून मला प्रेरणा आणि वेळोवेळी मदत मिळाली. त्यानुसार मी वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीला लागलो. नीटमध्ये उत्तीर्ण होऊन व वैद्यकीय शिक्षण घेऊन मला डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे आईवडिलांच्या कष्टाला मी फळ देईन याचा विश्वास वाटतो.'
- आदित्य सावरकर, गुणवंत विद्यार्थी

बातम्या आणखी आहेत...