आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Akola ZP Electiomn Vanchit Aghadi Win | Akola Z.P. Deprived Of Victory In By elections, Shiv Sena's Drastic Defeat; Congress Is Also Wiped Out

'मविआ'चा प्रयोग फसला:अकोला झेडपीच्या पोट निवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय, शिवसेनेचा दारूण पराभव; काँग्रेसचा सफाया

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलच्या निवडणुकीत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. वंचितच्या उमेदवार लीना शेगोकार यांनी शिवसेनेच्या अश्विनी गवई यांचा 1 हजार 641 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचाही सफाया झाला. यानिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार या महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याचे दिसून आले. जुलै महिन्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक होणार असून, पोट निवडणुकीतील विजयामुळे सत्ता कायम ठेवण्याचा वंचितचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. सोमवारी निकाल जाहीर होताच वंचितच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हातरूण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गोरे विजयी झाल्या होत्या. मात्र, नामनिदर्शेनपत्र सादर करताना गोरे यांनी शेत जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञालेखात केला नाही, असा आरोप विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला होता. आयुक्तांनी गोरे यांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे पोट निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी बाळापूर येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

पक्ष - उमेदवार - मिळालेली मते
- वंचित - लीना शेगोकार - 4301
- शिवसेना - अश्विनी गवई - 2660
- भाजप - राधिका पाटेकर - 2091
- काँग्रेस - रशिका इंगळे - 362
- अपक्ष - अनिता भटकर - 39

असे आहे आताचे बलाबल

आता पोट निवडणुकीनंतर वंचितची सदस्य संख्या सर्वाधिक 25 झाली आहे. शिवसेना-12, काँग्रेस-04, राष्ट्रवादी काँग्रेस-04, भाजप-5, अपक्ष 02, प्रहार जनशक्ति पक्ष 01 अशी सदस्य संख्या आहे. दोन अपक्ष, प्रहार, शिवसेना, राकाँ, काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. मात्र, या पोट निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढली. पोट निवडणुकीच्या विजयामुळे वंचितची संख्या एकने वाढली असून, सत्ता कायम ठेवण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...