आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशव्यापी असहकार:विविध प्रलंबित मागण्यांसाठी जीवन विमा निगमच्या अभिकर्त्यांचे आंदोलन

मूर्तिजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जीवन विमा निगमच्या अभिकर्त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया विभाग अमरावती अकोला शाखा क्र.१ च्या वतीने देशव्यापी असहकार आंदोलन लियाफिचे विभागीय सचिव विनोद थुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुकारले आहे. १ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू आहे.

मूर्तिजापूर येथील भारतीय जीवन विमा निगमच्या सॅटॅलाइट कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या संदर्भात अभिकर्त्यांनी आंदोलन केले. अभिकर्त्यांनी विश्राम दिवस पाळून काळ्याफिती लावून घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला. लियाफी जॉईंट ॲक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन केलेले आहे. यामध्ये भारतीय जीवन विमा निगम द्वारा विमाधारक, अभिकर्त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, समस्या व मागण्यांसंदर्भात निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने संघटनेने आंदोलन केले. यामध्ये पॉलिसी धारकांचा बोनस वाढला पाहिजे, कर्जाचे, लेट फीचे व्याजदर कमी करावे, विमा हप्त्यांवरील जीएसटी मागे घ्यावा, विमा प्रतिनिधींच्यासाठी वेल्फेअर फंड तयार करावा, विमा प्रतिनिधींच्या मॅच्युरिटीमध्ये वाढ करावी, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून घ्यावा, प्रतिनिधींना न्याय, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळाला पाहिजे, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी लागू करावा, सीएलआय चॅनलचा विकास करावा या व इतर मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी किशोर गुप्ता, विलास नसले, प्रविण पिंजरकर, विनोद कथलकर, संजय गावंडे, निशाताई गांवडे, मोहन कुर्मी, नारायण सरोदे, अनिल घाटे, विनोद कोठारी, राजेंद्र भटकर, सतिश कुर्मी, सरीता गुप्ता आदींचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...