आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीक विमा याेजनेअंतर्गत तुटपुंजी माेबदला मिळत असल्याचे म्हणत अडगाव परिसरातील शेतकरी व शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयात ठिय्या आंदाेलन केले.
शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर प्रश्नांची सरबत्ती करीत जाब विचारला. मदत न मिळाल्यास आंदाेलन छेडण्याच येईल, असा इशारा दाेन दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेने दिला हाेता. आता हा मुद्दा निकाली निघण्यासाठी 23 डिसेंबरपर्यंत अवधी देण्यात आला.
शेतकऱ्यांनी पीक विमा याेजनेअंतर्गत वमिाही काढल्यानंतरही त्यांना पुरेसा माेबदला मिळालेला नाही. तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा विमा कंपनी व कृषी विभागाशी संपर्क साधला हाेता. माेबदला पुरेसा व वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी व शेतकरी संघटनेने जनजागृतीसाठी अनाेखी मोहीम राबविली. यानंतरही माेबदला मिळाला नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी शेतकरी व शेतकरी संघटनेने एसएओ कार्यालयात व एसएओंच्या कक्षातही आंदाेलन केले.
त्यांनी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे यांच्यासह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काैठकर, किरण काैठकर, संध्या पवार, मनिा पवार, मालीनी घाेडेस्वार, आशा देशमुख, पूनम नमिकर्डे, राजकल्या भाेपाले, आरिफा बी. अ. सादिक, तलजीलाबी फिराेज खा, फिरदाेस नगमा अजरअली, प्रतिभा बाेबडवार, प्रतिभा आंबेकर, आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.
ना फाेन उचलत, ना भेटायला येत
शेतकरी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काैटकर यांच्यासह आंदाेलकांनी कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारला. प्रतिनिधी फाेन उचलत नसून, ते अडगाव येथेही येत नाहीत. त्यांनी प्रतिसाद दिला असता तर आज गावातून अकाेल्यात येऊन आंदाेलन करण्याची वेळच आली नसती. हा भुर्दंडही आम्हाला सहन करावा लागणार आहे. याला जबाबदार काेण, असा सवालही काैटकर यांनी केला.
294 शेतकऱ्यांची दिली यादी
विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी व आंदाेलकांमध्ये चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या वमि्याच्या दाव्याची नेमकी स्थिती काय आहे, हे प्रतिनिधी लॅपटाॅपवर सर्च करून सांगत हाेते. अखेर सर्व यादी क्लिअर करण्यासाठी 23 डिसेंबरपर्यंत शेतकरी प्रतीक्षा करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.