आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नतीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा:तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे आंदोलन; काळी फीत लावून निषेध

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदोन्नतीचे प्रस्ताव मार्गी लावण्यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने आंदोलन केले. काळी फीत लावून अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाही दिल्या. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सेवाविषयक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या मान्यहोण्यासाठी संघटनेने संघटनेने शासनाला ३० मार्च रोजी टप्प्याटप्याने आंदोलन करण्याचा इशारा दिलाहोता. याचाच एक भाग म्हणून १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी , तहसीलदार, नायब तहसीलदारांनी काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. शासनाने धरणे आंदोलनाची दखल न घेतल्यास १८ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय सामूहिक रजा काढून धरणे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात त्यांच्यासह उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, विश्वनाथ घुगे,सदाशिव शेलार,बाबासाहेब गाढवे, डाॅ. नीलेश अपार, अभयसिंह मोहिते, तहसीलदार सुनील पाटील, संतोष शिंदे, बळवंत अरखराव , संतोष येवलीकर, दीपक बाजड , गजानन हामांद, प्रदीप पवार, मीरा पागोरे, प्रतिक्षा तेजनकर, नायब तहसिलदार अजय तेलगोटे, महेन्द्र आत्राम, अतुल सोनवणे, राजेश गुरव,राजू दबेराव, हरीश गुरव, नंदकिशोर कुंभरे, एहसानोद्दिन सय्यद, शिव्हारी थोंबे सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...