आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:प्रभाग क्रमांक 17 मध्ये नाल्यांची साफसफाई न झाल्यास आंदोलन ; महापालिका प्रशासनाला इशारा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा तोंडावर आलेला असताना प्रभाग क्रमांक १७ (जुना) च्या अनेक भागात सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने पावसाळा सुरु होण्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी महापालिका प्रशासनाला एका निवेदनातून दिला. मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई न झाल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले. प्रशासनाने नाल्यांची साफसफाई सुरु केली आहे. मात्र साफसफाईचे काम संथगतीने सुरु असल्याने हरिहरपेठ भागासह अनेक भागात लहान-मोठ्या सर्व नाल्या तुंबल्या आहेत. मोठ्या नाल्यांमध्ये जलकुंभीही वाढली आहे. याबाबत मागील एक महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करुनही अद्याप नाला सफाईचे काम झालेले नाही. हा भाग मोर्णा नदीकाठी येतो. त्यामुळे मोर्णेला थोडा पुर आला की नागरिकांच्या घरात पाणी जाते. ही गंभीर बाब लक्षात घेवून लवकरात लवकर नाला सफाईच्या कामास प्रारंभ करावा अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेश मिश्रा यांनी एका निवेदनातून महापालिका प्रशासनाला

बातम्या आणखी आहेत...