आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दौरा:कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज वाशीम जिल्ह्यात

वाशीम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे २३ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते सकाळी ११ वाजता मालेगाव येथे पोहचल्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फतच्या शेतबांधावरील प्रयोगशाळेला भेट देतील. नंतर दुपारी १२ वाजता मंगरुळपीर येथे हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क मेळाव्याला तर दुपारी २ वाजता वाशिम येथील विठ्ठलवाडी सभागृहात आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करतील. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील काटा रोडवर बांधण्यात येत असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी संकुलाची पाहणी करतील. नंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभार्थ्यांच्या वारसांना अनुदानाचे वाटप करण्यात येईल. सोईनुसार ते परभणीकडे प्रयाण करतील.

बातम्या आणखी आहेत...