आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील हनुमान मंदिर परिसरात ३० जानेवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवजयंती उत्सव समिती गठीतकरण्यात आली.यावेळी समितीच्या अध्यक्षपदी आकाशसिरसाट,उपाध्यक्षपदी गणेशजाधव तरसचिवपदी वैभवमाळादे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच शिवजयंतीनिमित्त सामाजिक, धार्मीक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह दुचाकी रॅलीच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपले राजकीय जोडे बाहेर काढून फक्त शिवभक्त म्हणून सहभागी झाले होते.
स्वाभिमान जागविण्यासाठी मॉ साहेब जिजाऊंच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी धाड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ३० जानेवारी रोजी सागर गुजर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनात्मक बैठक पार पडली.
यावेळी विठ्ठलराव जट्टे, सुखराम गुजर, किरण सरोदे, दिलीप ठाकरे, अनंत उबाळे, विशाल विसपुते, संतोष उबाळे, राजू गायकवाड, प्रभाकर गुजर, सुनिल वाघ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवजयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आकाश सिरसाट, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव वैभव माळोदे, सहसचिव संदीप खेडकर, संघटक राजू गायकवाड, सहसंघटक राजू गुजर, कार्याध्यक्ष प्रताप डूकरे, कोषाध्यक्ष रमेश चोपडे, प्रसिध्दी प्रमुख सचिन नेमाने, सदस्यपद विष्णु घाडगे, राहूल येंडोले, आकाश तोटे, नितीन परमेश्वर यांची निवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.