आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारव्हा येथून लग्न वऱ्हाड घेऊन परत येणाऱ्या उभ्या वाहनाला मागून ट्रक (चेचीस)ने धडक दिल्याने ४ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी ६ मे रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान हातगाव जामठी फाट्याजवळ घडली.
दारव्हा येथून एमएच २६ एके ००६२ या मॅक्सीमो गाडीने वऱ्हाड घेऊन येत असताना हे वाहन जामठी (हातगाव) फाट्या दरम्यान बंद पडले. या वेळी मागून येणाऱ्या ट्रक चेसीस क्रमांक जेएच ०५ ए ८४३८ (तात्पुरता क्रमांक ) ने बंद पडलेल्या वऱ्हाडी वाहनाला धडक दिली.
या धडकेत बंद वाहनातील नरेश दिवाकर जाधव (३२), कमला दीपक जाधव (५०), श्याम राजेंद्र गायकवाड (२२), निलेश गोरख वानखडे (२७) सर्व राहणार दाळंबी, स्वज्वल सुधाकर जाधव (२१), पियुष सुधाकर जाधव (२०), भोजराज नामदेव जाधव (५२), संगीता गजानन जाधव (४१), कुसूम सुधाकर जाधव (६५), माधुरी नामदेव गायकवाड (५२), सुभाष सदाशिव गायकवाड (६९), अरविंद भानुदास तायडे (२४) राहणार अमरावती, परतवाडा, वरुड हे जखमी झाले. यापैकी ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
याची माहिती कळताच १२ जखमी अपघातग्रस्तांना संत गजानन महाराज संस्था आमदार हरीष पिंपळे द्वारा संचालित रुग्ण वाहीकेतून लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्या पैकी ४ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले . यासंदर्भात ग्रामीण पोलिसांनी ट्रक चेसीच चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक हिंमत ठाकरे, हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.