आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिका क्षेत्रामध्ये थकित मालमत्ता कर धारकांवर मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात सिल लावण्याची कारवाई सुरू आहे. या अनुषंगानेच थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने पश्चिम झोन आणि उत्तर झोन मधील एकूण तीन मालमत्तांना सिल लावण्यात आले.
पश्चिम क्षेत्रातील डाबकी रोड, भौरद येथील गट क्रं. बी-12, मालमत्ता क्रं. 3354 होटेल केसर यांचेकडे 2020-21 ते 2022-23 पर्यंतचा 92 हजार 149 रुपयाचा तसेच उत्तर क्षेत्रातील अलंकार मार्केट येथील गट क्रं. सी-3, मालमत्ता क्रं. 963 अझरोद्दीन हाजी सलामोद्दीन यांचेकडे 2017-18 ते सन 2022-23 पर्यंतचा एकुण 1 लाख 47 हजार, 876 रुपये,तर उत्तर झोन मधीलच बुरड गल्ली येथील गट क्रं. सी-3, मालमत्ता क्रमांक 1670, जोखीराम जीवनराम जीन, मालक राजकुमार गुप्ता यांचे कडे सन 2008-09 ते 2022-23 पर्यंतचा 1 लाख 91 हजार रुपये मालमत्ता कर थकीत होता. थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना करुनही मालमत्ता कराचा भरणा न केल्याने अखेर या तिनही मालमत्तेला सिल लावण्यात आले.
या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव, सहा.कर अधिक्षक गजानन घोंगे, सहा.कर अधिक्षक हेमंत शेळवणे, अजय सावदेकर, प्रविण भालेराव, दिनेश देहलीवाले, मोहन घाटोळ, संदीप जाधव, दिलावर खान, अविनाश वासनिक, चंदु मुळे आणि फिरोज खान आदींनी केली. दरम्यान ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करुन जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभागाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.