आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला बाजार समिती फुल्ल:शनिवारपर्यंत तूर स्वीकारण्यास ब्रेक; आवारात सर्वत्र शेतमाल

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक प्रचंड वाढली असून, शनिवारपर्यंत तूर आणण्यासाठी ब्रेक लावण्यात आला आहे.

यंदा काही ठिकाणी तुरीचे उत्पादन वाढले असून, शेतकरी तूर विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणत आहेत. अडते, खरेदीदार व शेतकरीऱ्यांना तूर हर्राशी विक्रीकरिता आलेल्या दिवशी होत नसल्याचे दिसून आले. तसेच तूर शेतमाल उतरविण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी व वाहनधारकांना दिवसभर वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसाेय हाेत असून, त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. बाजार समितीमध्ये तूर शेतमाल प्रलंबित राहत असल्याने तूर शेतमालाची आवक 4 मार्च 2023 पर्यंत स्वीकारण्यात येणार नाही.

रस्त्यावरही पाेते

अकाेला बाजार समितीच्या यार्डासही हरभरा व अन्य शेतमालाचे पाेते ठेवण्यात आले आहेत. अनेकांनी वाहनांमध्येही शेतमाल भरूनही ठेवले आहे. तसेच मुख्यद्वाराकडून आतमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरही पाेते ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एकबाजूचा काही रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. परिसरातच शेतमाल स्वच्छ करण्यात येत आहे.

त्यामुळे लवकर तूर विकून हवेत पैसे

संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे 98 हजार 321 हेक्टरवरील पिकांचे नुकसान हानी झाली. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान 36 हजार 272 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सततधार पावसाने 80 हजार 671 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले हाेते. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, असलेल्या तुरीची लवकर विक्री हाेणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...