आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील कृषी पंपाना दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा आणि पीक विम्या याेजनेअंतर्गत तातडीने पुरेसा माेबदला मिळावा, यासाठी 16 जानेवारी राेजी शेतकऱ्यांचा रूमणे माेर्चा निघणार असल्याची माहिती शिवसेनेतर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जिल्ह्यातून जवळपास 10 हजारांवर शेतकरी महावतरण कंपनीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रकार परिषेदला प्रामुख्याने सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर यांनी संबाेधित केले.
पूर्वि विदर्भात कृषी पंपांना दिवसा 12 तास विद्युत पुरवठा हाेताे. मात्र पश्चिम विदर्भात 8 तास विद्युत पुरवठा हाेताे. तेही चार दिवस रात्री-संध्याकाळी व तीन दिवस दिवसा पुरवठा हाेताे. त्यामुळे पूर्व िवदर्भाप्रमाणेच पश्चिम विदर्भातही दिवसा पुरेसा विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस व भाजपवर निशाणा
शेतकऱ्यांप्रति जिव्हाळा, आत्मियता असल्यास जिल्ह्यातील भाजप आमदारांनी शेतकऱ्यांच्या माेर्चात सहभागी व्हावे, असे म्हणत आ. देशमुख यांनी भाजपला काेंडीत पकडले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऊर्जा मंत्री व अकाेल्याचे पालकमंत्रीही आहेत. शेतकऱ्यांना न्याय देणे, हे तर पालकमंत्र्यांचे कर्तव्यतच असते, असेही आ. देशमुख म्हणाले.
आधी विधीमंडळात आता रस्त्यावर
अशी आहे तयारी
शेतकऱ्यांच्या माेर्चासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. माेर्चासाठी तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये शाखा प्रमुखापासून ते तालुका प्रमुख व काही ठिकाणी उपजिल्हा प्रमुख बैठका घेणार आहेत. शेतकरी हातात रूमणे, ट्रॅक्टर घेऊन सहभागी हाेणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.