आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या काळात शेती बिन भरवशाची झाली आहे. कधी कमी पाऊस तर कधी अतिवृष्टी, कधी वादळी पाऊस, गारपीट व अन्य नैसर्गिक संकटामुळे जोपर्यंत शेतातील पीक घरी येत नाही तोपर्यंत काय होईल? काहीही सांगता येत नाही. तुलनेने रब्बी हंगामातील पिके खात्रीशीर असतात. त्यातही गतवर्षीपासून गहू हरभऱ्याला फाटा देऊन शेतकरी उन्हाळी ज्वारी पिकाचा प्रयोग करीत आहे.
त्यामध्ये ते यशस्वी झाल्याने गहू, हरभऱ्यापेक्षा पेक्षा ज्वारी फायदेशीर आहे असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यातील शेती काळी कसदार व सुपीक आहे. या जमिनीमध्ये कोणतेही पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते, अशी तज्ञांचे मत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस ,वादळ वारा, गारपीट व अन्य नैसर्गिक संकटांमुळे व सोबतच बदलत्या वातावरणामुळेशेती बिन भरवशाची झाली आहे.
तालुक्यातील पिके
तालुक्यात प्रामुख्याने कपाशी सोयाबीन मूग, उडीद, तीळ आदी पिके पावसाळी पिकांमध्ये घेतल्या जातात तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब , व टरबूज खरबूज याचीही शेती तुरळक प्रमाणात दिसून येते.
तालुक्यात खारपाणपट्ट्याचा परिसर वगळल्यास उर्वरित भागात भूगर्भात पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे ,असे शेतकरी रब्बी पिके घेतात तर काही शेतकरी वान धरणाच्या पाण्यावर गहू, हरभरे पेरतात. पण गेल्या काही दिवसापासून नैसर्गिक संकटांमुळे गहू, हरभऱ्याच्या पिकांना उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी येत आहे, अशा प्रकारची स्थिती आहे.
ज्वारीची पेरणी ठरली फायद्याची
मागीलवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची पेरणी केली, ती फायदेशीर ठरली. त्यामुळे यावर्षी उन्हाळी ज्वारी लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एका एकरामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल ज्वारीचे पीक होत असल्याने तसेच गुरांच्या चाऱ्यासाठी लागणारा कडबा एका एकरात साधारणपणे पाचशे पेंड्या निघतो.
लागवडीचा खर्च हा कडब्यामध्ये निघतो तर ज्वारी पूर्णपणे नफ्यात राहते. यावर्षी ज्वारीला तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे व झडती देखील चांगली आहे. त्यामुळे यावर्षीपेक्षाही पुढील वर्षी ज्वारीचा फेरा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.