आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला सन २०२३च्या खरीप हंगामासाठी नियाेजन कृषी विभागाने तयार केले असून, शनिवारी नियोजन सभा हाेत आहे. यंदा ४ लाख ६९ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील पेरणी नियोजन प्रस्तावित करण्यात येणार असून, यासाठी बियाण्यांची मागणी ६९ हजार १५२ िक्वंटलवर पाेहाेचली आहे
. गत वर्षी खरीप हंगामात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे िपकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. त्यामुळे यंदा संभाव्य पर्जन्यमान व त्याअनुषंगाने उपाय याेजना, यावर बैठकित काेणती चर्चा व निर्णय हाेताे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अवकाळीचा बळीराजाला फटका
सभेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अाॅनलाईन पद्धतीने सहभागी हाेणार आहेत. जिल्ह्यात गत वर्षी जून ते सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसला हाेता. खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून काढू, असा िनर्धार करीत शेतकरी कामाला लागला हाेता.
मात्र यंदा मार्च महिन्यात चार वेळा झालेल्या अवकाळी पावसाचे सत्र एप्रिल महिन्यातही सुरूच हाेते. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना प्रचंड अाशा असून, कृषी िवभागानेही बियाणे व अन्य नियोजन करण्यात अाले. नियोजन सभेत हे नियोजन ठेवणार असून, त्यानंतर याला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.
मागणी व पेरणी क्षेत्र
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने नियोजन व मागणी प्रस्तावित केली आहे. सध्या : ६९,१५२ क्विंटल बियाण िमळाले आहे. काेणत्या पिकासाठी किती बियाणे लागणार आहे, याचेही नियोजन केले आहे. बियाणे: साेयाबीन : ६१,१६३ क्विंटल, तूर : ३०४५, मुग : ३८०, उडिद: ४२०, ज्वारी:३००, मका:३८, बाजरी : ५, तीळ:१.२०, कापूस : ३,८०० (८ लाख पॅकेट्स) चे नियोजन आहे.
असे आहे नियोजन
प्रमुख िपकांचे क्षेत्र:४ लाख ६९,६०० हेक्टर एकूण िबयाणे मागणी:६९,१५२ क्विंटल. महाबीजकडून िमळाले :१७,७५० क्विंटल. खाजगी उत्पादकांकडून िमळाले : ५१,४०२ क्विंटल. अाज हाेणाऱ्या खरीप नियोजन सभेत हाेणार चर्चा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.