आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे सुरू:अकोला- अकोट पॅसेंजर रेल्वे सुरू होणार

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला ते अकोट पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यास आता मंजूरी मिळाली आहे. या मार्गावर लवकरच प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

दरम्यान दक्षिण मध्य रेल्वेकडून याबाबत शुक्रवारी ४ नाेव्हेंबरला सूचना देण्यात आल्या. त्यानुसार अकोला ते अकोट रेल्वे मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून पॅसेंजर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

यासाठी शुक्रवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि संबंधित सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची अकोला येथे बैठक आहे. यात रेल्वे सेवा सुरु करण्याबाबतील आढावा घेण्यात येणार आहे. आवश्यक कामाची पाहणी केल्यानंतर लवकरच मार्गावर पॅसेंजर धावणार आहे. काही दिवसांपूर्वी अकोट रस्त्यावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळण्याची भीती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी हा पुल बंद केला आहे. यामुळे अकोल-अकोट मार्गावर मागील अनेक वर्षापासून प्रलंबित रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला होता.

अकोट- अकोला शटल रेल्वे सुरू करण्यासाठी खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. मार्गावर रेल्वे सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...