आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला-अकोट रेल्वे उद्यापासून धावणार:अकोट रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा, सकाळी 11 वाजता पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखवणार

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर अकोला-अकोट रेल्वे उद्यापासून धावणार आहे. सकाळी 11 वाजता पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखविली जाणार आहे. गाडी अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 6 वरून अकोटकडे निघेल. मात्र, जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने अकोला-अकोट रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा अटी-शर्तींच्या अधीन राहून होणार आहे.

मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती किंवा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम गत आठवड्यात जाहीर झाला. शुक्रवारी संबंधित तहसीलदारांनी निवडणुकीची अधिसूचनाही जारी केली.

जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. मतदान 18 डिसेंबर आणि मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदर्श आचार संहिता लागू असल्याने अकोला-अकोट पॅसेंजर सुरू करण्याच्या सोहळ्यावर मर्यादा आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे पत्र धडकले

राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना 22 नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात काही महत्त्वाच्या बाबींचा उहापोह केला आहे. अकोला - अकोट रेल्वे मार्गाचा सोहळा हा होणारा अकोला रेल्वे स्थानकवर होणार असून, हा भाग महापालिकेच्या हद्दित सामविष्ट होतो. ग्राम पंचायत निवडणुकीची आचार संहिता शहरी भागात लागू होत नाही. मात्र, ग्राम पंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणीही कृती किंवा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही. या अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यास हरकत नसावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी राहणार ट्रेन सुविधा

  • अकोला वरून सकाळी 6, सायंकाळी 6 वाजता ट्रेन
  • अकोटवरून सकाळी 8 , सायंकाळी 8 वजता ट्रेन
  • 30 रूपये तिकीट,1 तास 20 मी. प्रवास
  • उगवा, गांधीग्राम, पास्टुल थांबे
बातम्या आणखी आहेत...