आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला-अकोट रस्त्याचे रखडलेले काम राज्य विधि मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधविेशात चांगलेच गाजले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुद्दा उपस्थित केला. यावर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले. लवकरच याबाबत बैठक होणार असून, एप्रिल २०२२ पर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याचे प्रस्तावित आहेत, असेही ते म्हणाले.
अकोला-अकोट रोडचा शेकडो नागरिक वापर करतात. या रस्त्यावर रोज प्रचंड रहदारी असते. मात्र या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर ठिकठिकाणी अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेकांचा जीवही गेला आहे. मात्र तरीही रस्त्याच्या कामाने वेग घेतलेला नाही. काम तातडीने होण्यासाठी अनेकदा सरकारी यंत्रणांकडे समाजिक संघटना, राजकीय पक्षांनी धावही घेतली. मात्र तरीही काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान रस्त्याच्या रखडलेच्या कामाचा मुद्दा आता विधी मंडळापर्यंत पोहोचला आहे.
यावर टाकला प्रकाशझोत : अकोल हे अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा तालुक्यासाठी दळणवळणासाठी प्रमुख शहर आहे. मात्र अकोट अकोला-अकोट-शेगाव हा रस्ता पूर्ण झालेला नाही. रस्त्यांबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. अनेकदा उत्तरांमध्ये काम बऱ्यापैकी झाले आहे; शेवट्याच्या टप्प्यात आहे, असे सांगण्यात येते. वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे काम थांबले आहे. मी काही अंशी समाधानी व काही अंशी असमाधानी असून, कामे पूर्ण होण्यासाठी बैठक घेण्यात येईल काय ,असा सवाल त्यांनी केला.
अकोट येथील रूग्णांची अमरावतीच्या रुग्णालयाकडे धाव
पश्चिम विदर्भात अकोल्याकडे मेडिकल हब म्हणून पाहिले जाते. अकोल्यात सर्वोपचार रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह खासगी अत्याधुनिक रुग्णालये आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील रूग्ण अकोल्यात उपचारासाठी येतात. मात्र सध्या अकोट-अकोला रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे अकोटच्या रूग्णांना उपचार किंवा जटील तपासणीसाठी अकोलाऐवजी अमरावतीकडे धाव घ्यावी लागते.
लवकरच घेणार बैठक
रस्त्याच्या कामाबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. वन विभागाच्या आडकाठीमुळे ३२० मीटरचे काम थांबले होते. काम आता सुरू आहे असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.