आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला-अकोट रेल्वे अखेर धावली:प्लॅटफॉर्म 6 वरून दाखविला हिरवा झेंडा; 4 वर्षांची प्रतीक्षा संपली

अकोला6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर अकोला-अकोट रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. सकाळी 11.30 वाजता पॅसेंजरला प्लॅटफॉर्म 6 वरुण हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी गाडीला फुले आणि फुग्यांनी सजविण्यात आले होतो. वाजत-गाजत अनेक मान्यवाराच्या साक्षीने गाडीला रवाना करण्यात आले. प्रवशांचा पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद होता.

यांच्या हस्ते झाले उदघाटन

आज सकाळी दिल्लीवरून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुंबईवरून उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ऑनलाईन गाडी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. हरिष पिंपळे आदीं, तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थिती होते.

निवडणूक आचार संहितेत कार्यक्रम

जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने अकोला-अकोट रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा अटी-शर्तींच्या अधीन राहून झाला. मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती किंवा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदर्श आचार संहिता लागू असल्याने अकोला-अकोट पॅसेंजर सुरू करण्याच्या सोहळ्यावर मर्यादा आली.

गुरुवारपासून सकाळची सुविधा

बुधवारी सकाळी पहिली फेरी 11.30 वाजता निघाली. त्यानंतर सायंकाळची फेरी राहिल. गुरुवारपासून मात्र, नियमित सकाळ संध्याकाळ सेवा राहील. गाडी क्रमांक 07718 सकाळी अकोला रेल्वे स्टेशन फलाट 6 वरून सकाळी 7 वाजता सुटेल, स. 7.10 मी. उगवा पोहचेल, सकाळी 7.11 वाजता येथून सूटेल. 7.21 वाजता गांधीस्मारक रोड पोहचेल 7.22 वाजता येथून सुटेल. पास्टुलला 7.37 वाजता पोहचेल, 7.38 ला येथून निघेल व 8.20 वाजता अकोट पोहचेल. परतीला 9 वाजता अकोल रेल्वे स्थानकावरून निघून 9.10 पास्टुल, 9.26 गांधीस्मारक रोड, 9.37 उगवा असा थांबा घेत अकोला रेल्वे स्टेशनला 10.20 मी. पोहचेल.

सायंकाळची ट्रेन अशी

गाडी क्र. 07720 सायंकाळी 6 वाजता अकोला रेल्वेस्टेशन येथून ट्रेन निघेल. सायं.6.10 उगवा, सायं. 6.20 गांधीस्मारक रोड, सायं. 6.37 पास्टुल असे थांबे घेऊन सायं. 7.20 वाजता अकोट पोहचेल. रात्री 8 वाजता अकोट येथून गाडी सुटेल, पास्टुल 8.10, गांधीस्मारक रोड सायं. 8.26, सायं. उगवा 8.37 असा थांबा घेऊन सायं. 9.20 वाजता अकोट पोहचेल. गाडीचे 30 रूपये तिकीट, 1. तास 20 मी. प्रवास असा प्रवास आहे. तीन स्टेशनवर 1 मिनिट गाडीचा थांबा आहे.

बातम्या आणखी आहेत...