आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे:अकोला-अकोट रेल्वे आजपासून दरराेज धावणार

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर अकोला-अकोट रेल्वे आजपासून धावणार आहे. सकाळी ११ वाजता पॅसेंजरला हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. गाडी अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ६ वरून अकोटकडे निघेल. मात्र, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अकोला-अकोट रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा अटी-शर्तींच्या अधीन राहून होणार आहे.

मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती किंवा भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. हा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये

गुरुवारपासून अशी सुविधा
बुधवारी सकाळी पहिली फेरी ११ वाजता सुटणार आहे. त्यानंतर सायंकाळची फेरी राहिल. गुरुवारपासून मात्र, नियमित सकाळ- संध्याकाळ सेवा राहील. गाडी क्रमांक ०७७१८ सकाळी अकोला रेल्वे स्टेशन फलाट ६ वरून सकाळी ७ वाजता सुटेल, स. ७.१० मी. उगवा पोहाेचेल, सकाळी ७.११ वाजता तेथून सुटेल. ७.२१ वाजता गांधीस्मारक रोड पोहाेचेल ७.२२ वाजत

बातम्या आणखी आहेत...