आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला- अकोट रेल्वे बुधवारपासून धावणार:30 रुपये तिकीट; दिवसातून सकाळ सायंकाळ अशा फेऱ्या

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोट रेल्वे अखेर सुरू होत आहे. शनिवारी ट्रेनच्या वेळा जाहीर करण्यात आल्या होत्या. पण नागरिकांमध्ये तारखीबाबत उत्सुकता होती. रविवारी दक्षीण मध्यरेल्वे विभागाचे प्रबंधक उपिंदर सिंह यांनी अकोला रेल्वे स्टेशन दौरा केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यानुसार 23 नोव्हेंबर, बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता अकोला-अकोट पॅसेंजला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.

अशी राहिल सेवा

अकोला-अकोट पॅसेंजर डिजेल गाडी आहे. ही आठ डब्याची गाडी असून अकोट-अकोला प्रवास जवळपास दीड तासात पूर्ण करेल. तीस रूपये अकोटसाठी दर आकारले जातील. परतिचेही दर सारखेच आहे. उगावा, गांधीग्राम रोड आणि पास्टुल तीन थांबे निश्चित आहेत. याठिकाणी तिकीट काढण्याची व्यवस्था आहे. थांब्यावरील तीनही स्टेशनची पाहणी पूर्ण झाली आहे. प्रवाशांना आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध असेल.

वेळांमध्ये बदल होणार

दौऱ्यात डीआरएम यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आ. रणधीर सावरकर यांच्यासोबत चर्चा केली. सध्या जाहीर झालेल्या वेळानुसार अकोला रेल्वे स्टेशवरून अकोटसाठी सकाळी 6 वाजता ट्रेन निघेल, स. 9.20 मी. अकोट पोहचेल. अकोटवरून सकाळी 8 वाजता गाडी सुटेल, अकोला रेल्वे स्टेशन येथे स. 9.20 वाजता पोहचेल. गाडीची दुसरी फेरी सायंकाळी आहे. यानुसार रात्री 6 वाजता अकोला येथून ट्रेन निघेल, ती सायं. 7.20 ला गाडी अकोट पोहचेल. परतीसाठी रात्री 8 वाजता निघेल, ती रात्री 9.20 मी. अकोला स्थानकावर पोहचेल. मात्र, सकाळी 6 वाजताची वेळ प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची नाही. त्यामुळे अकोल्यावरून सकाळी 7 वाजता गाडी सोडण्याची मागणी यावेळी स्थानिक आम. रणधीर सावरकर यांनी केली.

यांच्या हस्ते होणार उद्घाटन

23 तारखेला सकाळी 10.30 वाजता दिल्लीवरून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुंबईवरून उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ऑनलाईन गाडी हिरवी झेंडी दाखविणार आहेत. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. हरिष पिंपळे आदीं, तसेच रेल्वेच्या प्रमुख अधिकारीऱ्यांची यावेळी उपस्थिती असेल.

बातम्या आणखी आहेत...