आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात एप्रिल महिन्यात भर उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 13 हजार 833 हेक्टर क्षेत्रातवरील पिकांचे नुकसान झाले. एक वेळा झालेल्या नुकसानाचा अंतिम पाहणी अहवाल तयार झाला असून, उर्वरित दाेन वेळा झालेल्या नुकसानाची प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे.
संपूर्ण महिन्याचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गत वर्षी जून ते सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा पिकांना फटका बसला हाेता. खरीपमध्ये झालेले नुकसान रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या आशेने शेतकरी कामाला लागले. मात्र मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह िवजांच्या कडकडाटात जाेरदार पाऊस झाला.
शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लिंबू, आंबा, संत्री, गहू, भाजीपाला, कांदा पिकाचे नुकसान झाले हाेते. बाळापूर तालुक्यात २६ एप्रिलला झालेल्या पावसामुळे शेतात चिखल तयार झाला हाेता. जिल्ह्यातील बाधित गावे ७०७ नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १५,३७१ एकूण बाधित क्षेत्र ९,२६८ पातूर व बार्शीटाकाळी तालुक्यात २६ ते २७ एप्रिलदरम्यान पावसामुळे ३ हजार ६६५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले.
या पावसाचा फटका ५६ गावांतील २ हजार ३४५ शेतकऱ्यांना बसला आहे. अकाेट, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यात २८ ते ३० दरम्यान अंदाजे ६९० शेतकऱ्यांच्या जवळपास ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. उपराेक्त दाेन्ही नुकसानाचे अंतिम पंचनामे सुरू आहेत.
काेणत्या पिकांना बसला फटका? अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झाले हाेते.पपई, केळी, लिंबू, आंबा, संत्रा, डाळिंब ही फळ पिके बाधित झाली. त्यासोबतच गहू, ज्वारी, हरबरा, भुईमुग, भाजीपाला, कांदा, मूग, मका, टरबुज व इतर बागायती पिकांचे नुकसान झाले.
एप्रिलमध्ये झालेले नुकसान
गारपिटीने असे नुकसान झाल्याचे संयुक्त अहवालात नमूद हाेते. हे पंचनामे कृषी, महसूल, जि.प. यंत्रणेने केले.
मार्चमध्ये झालेले नुकसान असे
तेल्हारा तालुक्यातात ६ व ७ मार्च राेजी २८६ शेतकऱ्यांच्या २०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. भरपाईसाठी ३५ लाख ३८ हजार ८९० रुपयांची गरज आहे. बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर तालुक्यात १५ ते १९ मार्च दरम्यान ६३५ शेतकऱ्यांच्या २ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी हानी झाली. बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात ३१ मार्च राेजी ६३५ शेतकऱ्यांचे ४३० हेक्टर क्षेत्रावरील पीके जमीदाेस्त झाली. नुकसान भरपाई देण्यासाठी ७८ लाख ४० हजार ९९५ रुपयांची गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.