आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोक वाटिका चौकात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपुलाच्या म्ूर्तिजापूरकडे जाणाऱ्या लॅन्डींग खाली दबलेली 350 मिमी तसेच लॅडींगच्या बाजूने गेलेली 700 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी अंथरण्याचे काम बुधवार दि. 25 रोजी सुरु करण्यात आले. दुरुस्तीच्या कामास पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहरु पार्क जलकुंभावरील पाणी पुरवठा पाच ते सहा दिवस ठप्प राहणार आहे. परिणामी 30 हजार नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
उड्डाणपुलाचे काम करताना लॅन्डींग खाली 350 मिली मिटर आणि 25 एमएलडी केंद्रातील 600 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी दबली होती. या दोन्ही जलवाहिन्या त्याचवेळी वळवणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने 18 डिसेंबर रोजी 600 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे शहरातील 8 जलकुंभाचा पाणी पुरवठा दहा दिवस ठप्प होता. तर याच लॅन्डींग खालून नेहरु पार्क जलकुंभावरुन विविध भागांना पाणी पुरवठा करणारी 350 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी दबली होती. 600 मिली मिटर जलवाहिनी वळवताना 350 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी बदलणे गरजेचे होते. मात्र ढिसाळ नियोजनामुळे हे काम होवू शकले नाही. परंतु आता हे काम सुरु करण्यात आले आहे.
700 मिमीचीही बदलणार
350 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी 40 मिटर वळविली जाणार आहे. तर नेहरु पार्क जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी 700 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी क्षतीग्रस्त झाल्याने ही वाहिनी देखील 20 मिटर लांब बदलण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
या भागाचा पाणी पुरवठा ठप्प
नेहरु पार्क जलकुंभाची साठवण क्षमता 18 लाख लिटर आहे. या जलकुंभातून दक्षता नगर, पोलिस क्वार्टर, कैलास टेकडी, निमवाडी, रजपूतपूरा, अकोला मेडीकल कॉलेज, खोलेश्वर, पोलिस हेडक्वार्टर्स आदी भागाला पाणी पुरवठा होतो. दुरुस्तीच्या कामामुळे या भागाचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.