आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापीक विमा याेजनेअंतर्गत तुटपुंजी माेबदला मिळत असल्याने शेतकरी संघटनेकडून गावांमध्ये रात्रीपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या माेहिमेअंतर्गत कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतनिधी व शेतकऱ्यांची बैठकही झाली. आता येणाऱ्या दाेन दविसात हा प्रश्न निकाली न निघाल्यास थेट कंपनीच्या अकाेल्यातील कार्यालयात शेतकऱ्यांनासाेबत घेऊन धडक देण्यात येईल, असा इशारा संघटनेनने साेमवारी दिला आहे.
शेतकरी आणि केंद्र- राज्य सरकार हिस्सा भरून विमा काढण्यात येताे मात्र माेबदला पुरेसा व वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकरी संघटनेने जनजागृतीसाठी अनाेखी माेहिम सुरू केली आहे.
अशी आहे माहिती
सन 2022-23मध्ये पीक विमा याेजनेअंतर्गत 3 लाख 20 हजार 941 शेतकऱ्यांनी 24 काेटी 21 काेटी 55 लाख आिण केंद्र राज्य सरकारने आपला प्रत्येकी हिस्सा 55 काेटी भरला. यातून 2 लाख 65 हजार 121 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. पीक वमि्याचे 85 हजार दाव्यांपैकी 71 हजार 290दावे निकाली निघाले आहेत. यातून आतापर्यंत 40 काेटी 96 लाख रुपये माेबदला वितरीत करण्यात आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत माहिती सादर केली.
अशी राबविली जाते माेहिम
पीक विमाबाबत शेतकरी संघटने तेल्हारा तालुक्यातील अडगाव परिसरात माेहमि राबविली. माेहिमेेत शेतकऱ्यांसह जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काैटकर, दनिेश देऊळकार, माेहन खिराेळकार, अमाेल मसूरकार, रवींद्र भाेपळे, रवींद्र नमिकर्डे, नीलेष नेमाळे, दनिेश गिऱ्हे, मकसूद मुल्लाजी, जाफर खान, रामकिशाेर थुटे, विलास इंगळे, मंगेश रेडे आदी सहभागी झाले.
यासाठीही माेहिम
यंदा खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतविृष्टीमुळे 98 हजार 321 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच 1 हजार 724 हेक्टर जमीन खरडून गेली हाेती. अतविृष्टीमुळे सप्टेंबरमध्ये 23 हजार 851 आणि ऑक्टाेबर महिन्यात 10 हजार 413 हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणीही शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.