आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला बार असोसिएशनची २०२३-२४ ची सार्वत्रिक निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. अध्यक्षपदासाठी चार विधिज्ञांचे अर्ज दाखल झाले आहेत. न्यायालयीन वर्तुळात सध्या निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी अॅड. अर्चना गावंडे, अॅड. संतोष गोळे, अॅड. हेमसिंह मोहता व अॅड. प्रवीण तायडे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
तर उपाध्यक्ष पदासाठी अॅड. प्रवीणकुमार होनाळे, अॅड. मुरलीधर इंगळे व अॅड. देवाशिष काकड यांनी आपले अर्ज दाखल केले असून, महिला उपाध्यक्षपदासाठी अॅड. आम्रपाली गोपनारायण, अॅड. अरुणा गुल्हाणे व अॅड. कांचन शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. तर सचिव पदासाठी अॅड. निखिल देशमुख, अॅड. सागर जोशी, अॅड. शिवम शर्मा व महेश शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अकोला बार असोसिएशनच्या १४२१ सदस्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर केली जाईल. अकोला बार असोसिएशनचे मावळते अध्यक्ष अॅड. सी. एन. वानखडे यांचा कार्यकाळ संपत असल्याने २०२३-२४ ची निवडणूक होऊ घातली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.