आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:अकोल्याच्या समीक्षाची सुवर्णझळाळी! राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले गोल्ड, उत्तरप्रदेशच्या खेळाडूवर 5-0 ने मात

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
स्पर्धेत पदक प्राप्त करणारे अकोल्याचे खेळाडू - Divya Marathi
स्पर्धेत पदक प्राप्त करणारे अकोल्याचे खेळाडू

कर्नाटक बैलारी येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. या झालेल्या स्पर्धेत आकोल्याची समीक्षा धनंजय सोळंके हिने 40 किलो वजन गटामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्ण पदक पटाकवले. गुरुवारी दुपारी स्पर्धेचे अंतिम सामने खेळले गेले. यात समिक्षाने उत्तरप्रदेशच्या खेळाडूवर 5-0 ने मात केली आहे.

स्पर्धेत महाराष्ट्र संघाला 5 पदक प्राप्त झाले आहे

स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू सुहानी बोराडे 46 किलो आणि भक्ती चुगडे 63 किलो वर्गामध्ये कांस्य पदक प्राप्त केले. समीक्षाने सेमिफायनलमध्ये हरियाणा खेळाडूवर 5-0 ने मात केली.समीक्षा सोळंके अकोल्यातील समर्थ पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. ही स्पर्धा 19 ते 26 मे दरम्यान बैलारी येथे पार पडली. स्पर्धेत महाराष्ट्र संघाला 5 पदक प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र संघासोबत अकोल्याच्या सपना बिरघट कोच म्हणून उपस्थित होत्या. खेळाडूंना अकोला क्रीडा प्रबोधिनीचे राज्य प्रशिक्षक सतिशचंद्र भट, गजानन कबिर यांनी मार्गदर्शन केले. विजेता प्राप्त खेळाडूंचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बजोरिया, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, उपसंचालक संतान तसेच क्रीडा प्रेमिंनी शुभेच्छा दिल्या.

अकोल्याच्या पाच पैकी तीन खेळाडूंना पदक

राष्ट्रीय स्पर्धेसाठी नियोजित महाराष्ट्र संघामध्ये अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या 5 खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेमध्ये एकूण प्राप्त पदकांमध्ये अकोला क्रीडा प्रबोधिनीला 3 पदक मिळाले. यात 1 सूवर्ण आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...