आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे सोमवारी दुपारी अकोल्यात संतप्त पडसाद उमटले. भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ (नेहरु पार्क ) एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करीत अजित पवार यांचा निषेध केला. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक संथ झाली होती.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत भाष्य केले होते.‘आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही जण धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केले नाही. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. संभाजी महाराजांचा उल्लेख हा धर्मवीर असा करू नये, असे ते म्हणाले होते. दरम्यान अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असून, 2 जानेवारी रोजी भाजपने रस्त्यावर धाव घेत आंदोलन केले. आंदोलनात भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे, सोनल ठक्कर, पल्लवी कुलकर्णी, लता गावंडे, डॉ. संगिता सुरंसे, वर्षा धनोकार, संगिता अढाऊ, राखी तिहिले, गोपाल नागपुरे, मंजुषा धोटेकर, साजिद, विक्रांत धनोकार, प्रभाकर वानखडे, अक्षय पाटील आदी सहभागी झाले.
अशा दिल्या घोषणा
भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो’, ‘गर्व से कहो हम हिंदू है’,‘नही सहेंगे नही सहेंगे तानाशाही नही सहेंगे’, अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा निषेध केला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही असेही, आंदोलक म्हणाले.
एका बाजूने वाहनांची रांग
भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ रास्ता रोको आंदोलनाने मूर्तिजापूर रोडकडे जाणारी वाहने अडकली. यात ट्रक व अन्य जड वाहनांचा समावेश हता. दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली असल्याने जास्त वेळ वाहतुकीची कोंडी झाली नाही. आंदोलकांनी ट्रक व अन्य जड वाहने रोखून धरली होती. आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.