आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादृष्टीबाधित दाम्पत्य रात्री उशिरा अमरावतीहून अकोल्यात आले असता त्यांनी बसस्थानकाबाहेर जाण्याचा रस्ता विचारला. मात्र, रस्ता दाखवण्याचा बहाना करीत निर्जनस्थळी नेत महिलेवर बलात्कार केला. गंभीर बाब म्हणजे हे कृत्य त्याने तिच्या पतीसमोरच केले.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. यानंतर लगेचच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. दुपारी पोलिस आरोपीला कोर्टात हजर करणार आहेत.
मुलीला भेटायला जाताना...
दृष्टीबाधित दाम्पत्यांना एक मुलगी आहे. अकोला तालुक्यात राहणाऱ्या आपल्या आजीकडे ती राहते. तर दाम्पत्य हे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे राहते. मुलीच्या भेटीसाठी ३१ मार्च रोजी दुपारी दोघेही परतवाडा बसस्थानकावरून दुपारी अकोल्याला येणाऱ्या बसमध्ये बसले होते. ते रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान अकोला बसस्थानकावर उतरले. पीडित महिलेने अनोळखी व्यक्तीला बसस्थानकाबाहेर जाण्याचा रस्ता विचारला असता एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हातधरून बाहेर आणले. त्यानंतर तो त्यांना जुन्या बसस्थानकावर घेऊन गेला. मात्र ज्या गावाला जायचे होते त्यागावात रात्री वादळवारा असल्याने त्यांनी रात्र रेल्वेस्थानकावर काढण्याचा निर्णय घेतला.
रेल्नेस्थानकावर सोडतो म्हणून...
अनोळखी व्यक्ती त्यांच्यासोबतच होता. तुम्हाला रेल्वेस्थानकावर सोडून देतो, असे म्हणून त्याने त्यांना ऑटोरीक्षात बसवले व रेल्वेस्थानकाच्या जवळच अज्ञात ठिकाणी नेले. त्यानंतर त्याने महिलेला पतीपासून थोडे दूर केले आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्यांना रेल्वेस्थानकावर सोडून दिले. घाबरलेल्या अवस्थेत दोघेही गावी गेले असता त्यांनी आपबिती सांगितल्यावर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठत त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
फुटेजवरून आरोपीला पकडले
पोलिसांनी लगेच घटनेचा तपास सुरू केला. बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज, तसेच बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज काढून आरोपीची ओळख पटवत काही तासाच्या आतच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भाऊराव घुगे यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.