आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा वर्धापन दिन; छायाचित्रकारांना अपघाती विमा कवच

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हयातील छायाचित्रकारांना भारतीय डाक विभागाच्या अपघाती विम्याचे कवच प्रदान करण्यात आले. अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने असोसिएशनच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. एलआरटी महाविद्यालयाच्या लगत असणाऱ्या फोटोग्राफर असोसिएशनच्या कार्यालयात असोसिएशनचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम असोसिएशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वृक्षारोपण मोहिमेत असोसिएशनचे जेवढे सदस्य तेवढे वृक्ष लावण्याचा संकल्प यावर्षीही राबवण्यात आला. वृक्षारोपण नंतर डाक अपघाती विमा शिबिर साकार करण्यात आले. हेड पोस्ट ऑफिसमधील पोस्ट बँकेचे व्यवस्थापक सुगत हलदर यांच्या सहकार्याने हे शिबिर राबवण्यात आले.

शुक्रवारी झालेल्या या शिबिरात फोटोग्राफर असोसिएशनच्या १०० सदस्यांनी अर्ज भरून विमा पॉलिसी काढून घेतली. हा उपक्रम टप्प्या- टप्प्याने सर्व सदस्यांना लाभ देण्यासाठी सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन अकोला- बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे यांनी या वेळी केले. शिबिरात असोसिएशनचे उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव उमेश चालसे, दत्ता सरोदे, कोषाध्यक्ष योगेश उन्होंने, सदस्य विशाल खंडारे, हर्षल गडेकर, महेश इंगळे, राहुल ताडे, सुशील बडेरे समवेत पंकज शेळके, प्रवीण आंबीलकर, शिवराज मसने, दीपक हिवरकर, संजय आगाशे, अजय आगाशे, गजानन आगरकर, प्रदीप कुलकर्णी, अतुल सायरे, राजू जोगदंड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...